रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

चैतन्य कानिफनाथ -१

                      

                   नाथ संप्रदाय हा अनादी आहे . आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा । मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य ।। असा हा परंपरेचा अभंग आहे त्याप्रमाणे या नाथ संप्रदायाचे आणि नगर जिल्ह्याचे फार जवळचे नाते आहे . गर्भगिरी पर्वतावर बरेच नाथ मंदिरे आहेत आणि त्याच्या आसपासच्या गावात सुद्धा नाथांचे मंदिर आपल्याला बघावयास मिळतात . नगरपासून ३५-४० किं मि. अंतरावर निवडूंगे  पाथर्डी तालुक्यातील गाव आहे आणि तेथून ३ कि. मि. वर मढी  हे गाव आहे , तेथे उंच टेकडीवर कानिफनाथांची भव्य गढी  आहे . तेथे त्यांची समाधी आहे ती समाधी संजीवन समाधी आहे . याच मंदिराच्या मागील बाजूस ध्यान गृह म्हणजे एक तळघर आहे त्यामध्ये एका वेळी एकाच माणूस जाऊ शकतो . असे हे अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आणि नाथांचे वास्तव्याने पुनीत झालेले आहे . सध्या तिथली व्यवस्था विश्वस्त मंडळी बघतात .
                             काहि मानिसक आजार असलेले लोकही येथे पाहायला मिळतात … तो विश्लेषणाचा भाग आहे तरी पण असे वाटते कि या लोकांना भलेही  मानसिक रीतीने का होईना बरे वाटते आणि ते घरी जातात . येथेही आता प्रसाद रुपात १० रुपयामध्ये  लाडू मिलतत. पण ! इथला खरा प्रसाद म्हणजे रेवडी प्रसिध्द आहे . देवाचा भगवा आणि पिवळ्या रंगातील नाडा भाविक हातात बांधतात किंवा गळ्यातही बांधतात . आपल्यावर काही संकटे येणार नाहीत आणि आली तरी कानिफनाथ महाराज ती दूर करू शकतील अशी श्रद्धा असते.
                              कानिफनाथ महाराज हे जालिंदरनाथांचे शिष्य आहेत . " जानपिर " नावाचे जे  ठिकाण आहे त मात्र बीड जिल्ह्यात आहे ते जानपीर म्हणजेच जालिंदरनाथ .. कानिफनाथ त्यांच्या काळात मोठे ऐशवर्ययुक्त असलेले मोठे संत होते त्यांचे प्रमुख शिष्य त्यावेळी ७०० होते . त्यांचे वैभव बघूनच गोपीचंद राजाचे त्यांचा अनुग्रह घेतला होता . पण त्याची आई मैनावती मात्र जालिंदर नाथांची शिष्य होती .
                    नगर जिल्ह्यातील नाथांची  सचित्र (फोटो)  माहिती आपणास सदर करीन व आणखी यावर विस्तृत पुस्तक सुद्धा मी लिहित आहे यथावकाश ते नाथांच्या कृपेने प्रकाशी होईल .
              ।।  ओम चैतन्य कानिफनाथ महाराजकी जय ।।
काही फोटो हे दि. २२-११-१४ च्या शनि अमावास्येच्या पावन पार्वतील अहेत.

अशोकानंद महाराज कर्डिले

 

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ