शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

।। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।-2





।। मच्छिंद्र तयाचा  मुख्य शिष्य ।।
आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य ।। १।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।
गहीनिप्रसाडे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार चोजाविले ।।३।।
                 श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली परंपरा सांगतांना हा वरील अभंग उधृत केला आहे . ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते  भागवतामध्ये ऋषभदेवाचे  एकूण १०० मुले होती असे वर्णन आहे त्यापैकी ९ विरक्त होते तेच हे नऊ नारायण कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन.आणि यांचाच कलीयुगामध्ये अवतार झाला त्यांची क्रमश: नावे  प्रथम पुत्र कवी हा “मच्छेंद्रनाथ या नांवाने जन्मला.”अन्तरिक्ष याने “जालंदर या नांवाने जन्म घेतला. यांच्या शिष्य रुपाने प्रबुद्ध “कानिफा या नांवाने अवतरीत झाला  पिप्पलायन “चर्पटनाथ नांवाने अवतरित झाला .अविर्होत्र हा “नागेशनाथ या म्हणून  अवतरित झाला. द्रुमिल याने “भर्तरीनाथ या नांवाने अवतार  घेतला. चमस हा “रेवणनाथ या रुपात अवतरित झाला आणि करभाजन “गहनिनाथ या नांवाने जन्मला..या सर्व नाथांचा भारतभर संचार होता तथापि महाराष्ट्रात आणि विशेषत: अहमदनगर जिल्ह्यात जास्त वास्तव्य झाले . नाथांनी सर्वसामान्य जनतेमध्ये धर्मप्रचार आणि धर्मप्रेम वाढवले त्यासाठी त्यांनी सिद्धीचा उपयोग केला . विशेषत: मोगलांच्या काळात सर्व नवनाथांचे कार्य फार महत्वाचे होते अनेक देवळे, मंदिरे यांचा मोगल विध्वंस करीत होते मात्र नवनाथांच्या मंदिराला आणि समाध्यांना  त्यांनी हात लावला नाही कारण एक तर हे सर्व सामान्य जनतेमध्ये खूपच लोकप्रिय होते आणि त्यांना हात लावणे म्हणजे जनतेच्या रोषाला सामोरे जाणे आणि हे परवडणारे नव्हते कारण जनतेने उठाव केला असता . दुसरे म्हणजे सर्व नवनाथांच्या समाध्या ह्या " मुस्लिमाच्या तुर्बातीसारख्या (क्बारीसारख्या ) होत्या . त्यामुळे यांचे पुजारी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे दिसतात . हा एक यातील चांगला भाग आहे त्यामुळे सामाजिक ऐक्य टिकवले गेले .
              श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड अर्थात मायंबा  हे स्थान मराठवाड्यातील  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव या गावी आहे . अहमदनगर जिल्ह्यात मांजसुम्भा येथील गोरक्षनाथ गडापासून पूर्व पश्चिम जी डोंगर रांग आहे तिला गर्भगिरी , गर्भाद्री , कनकाद्री  ,सुवर्णगिरी ,हेमाद्री अशी नवे अहेत. श्री गोरक्षनाथांनी जो सोन्याचा डोंगर केला होता तो हाच आहे त्यामुळे हि नावे आहेत . मच्छिंद्र व गोरक्षनाथांचे खरे प्रागट्य  येथेच झाले . असे सांगतात कि मच्छिंद्रनाथांचे  मूळ नाव " मायदेव " म्हणून या ठिकाणाला मायंबा देखील म्हणतात . जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात " तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वानू ।।" म्हणून मायंबाचा अर्थ माय-बाप असाही होतो नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात .  सांप्रदायिक नाव मात्र मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिध्द आहे . मिनिनाथ हे नाव मच्छिंद्रनाथांचेही नाव होते ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आढळतो  " ते आज्ञा श्री गोरक्षराया दिधली मिनी ।।" या संप्रदायाची खरी उपासना शैव पंथासी जास्त जवळची आहे म्हणून जिथे नाथांची समाधी आहे तिथे खाली तळघरात ध्यानगृह आढळते आणि त्यामध्ये शिवलिंग असते .मच्छिंद्रनाथ गड किंवा मायंबा हे अतिशय जागृत स्थान आहे . गर्भगिरीच्या माथ्यावर  हे ठिकाण असून सभोवताली निसर्ग सुंदर आहे . विविध झाडे , वेली सर्वत्र दिसतत.  रानमोगरा आसमंतात सर्वत्र दिसतो त्याच्या सुगंधाने परिसर गंधित झालेला असतो . नागमोडी पाऊलवाटा आणि त्या पाऊलवाटेने आसपासच्या गावातील गुराखी आपले जनावरे  घेऊन दर्या-खोऱ्यामध्ये फिरतांना दिसतात . आता सध्या मढी  ते मायंबा असा ७ कि. मि.  डांबरी रस्ता झालेला आहे तो रस्ता इतका मनोहर आहे कि, त्यावरून जातांना उंच डोंगर  आणि दरी फारच छान दिसते .साधारण २०० फुट उंचीवरून  कोसळणारा धबधबा आकर्षक दिसतो , विविध पक्षी किलबिलाट करतांना आसमंत भारून गेल्यासारखे होते. गडावर श्री माच्छिन्द्रनाथांची  चैतन्य समाधी आहे तेथून जवळच धोंडाई देवीचे मंदिर आहे .हि देवी नाथानी मानलेली बहिण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही .  तेथून खाली जो तलाव आहे त्यालाच "देव तळ "(तलाव ) म्हणतात गुढीपाडव्याला मोठी यात्रा असते त्यावेळी मच्छिन्द्रनाथांच्या अंगावरील मळी काढली जाते ती मळी देवतळ्यात टाकली जाते . हि मळी पाण्यात पूर्ण विरघळू पर्यंत ग्रामस्थांचा खडा  पहारा असतो . देव तळ्याचे  पाणी पवित्र समजले जाते , ते पाणी पिल्याने अनेक असाध्य व्याधी बर्या होतात असा नाथ भक्तांचा अनुभव आहे . ………। क्रमश:         


1 टिप्पण्या:

१८ एप्रिल, २०२४ रोजी ७:२८ AM वाजता, Blogger Rajendra Gurav Yamai Aundh म्हणातात...

माऊली श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली श्रेष्ठ गुरु परंपरा सांगतांना हा वरील अभंग रचलेला आहे.सुरुवातीला ते आदिनाथ सकळं गुरु सिद्धांचा अर्थात गुरुपरंपरेतील आद्यगुरु आदिनाथ भगवान महादेव यांना वंदन करतात आणि त्यांच्यापासून ही गुरुपरंपरा सुरू झाली कशी विकसीत झालीअसे निवेदन करतात . ( मूळ भावार्थात याचा समावेश व्हावा )

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ